काजोलने शेअर केला ‘तान्हाजी’चा मेकिंग व्हिडिओ


येत्या शुक्रवारी म्हणजेच १० जानेवारीला अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला ‘तान्हाजी – द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. काजोल आणि अजय देवगणची जोडी बऱ्याच काळानंतर या चित्रपटाच्या निमित्ताने पडद्यावर पाहायला मिळणार आहे. काजोलने ऐतिहासिक असलेला हा चित्रपट तयार करताना नेमकी कशी मेहनत घ्यावी लागली, हे दाखवणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित ‘तान्हाजी – द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट आहे. त्यांनी कोंढाणा गड सर करण्यासाठी आपल्या मुलाचे लग्न बाजुला ठेवुन प्राणाची बाजी लावली. या चित्रपटात त्यांची ही शौर्यगाथा पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा मेकिंग व्हिडिओ काजोलने पोस्ट केला आहे. दिग्दर्शक ओम राऊत या व्हिडिओमध्ये पडद्यामागे तान्हाजी साकारताना काय मेहनत घेतली, हे सांगताना दिसत आहेत. मराठी भाषेतही ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजय देवगन शिवाय यामध्ये सैफ अली खान, शरद केळकर आणि इतर बरेच मराठी कलाकार देखील यामध्ये भूमिका साकारणार आहेत.

Leave a Comment