पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर सोनम कपूरची स्तुतीसुमने


जेएनयूमध्ये फी वाढीविरोधात सुरू असलेल्या प्रदर्शनादरम्यान रविवारी हिंसाचार झाला होता. काठ्या आणि लोखंडाच्या रॉडने चेहऱ्यावर रुमाल बांधलेल्या काही जणांनी प्रदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली. सुमारे तीन तास कँपसमध्ये त्यांनी गोंधळ घातला. विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आइशी घोषसह अनेक जण हल्ल्यात जखमी झाले होते. केवळ सामान्य नागरिकच नाही तर राजकीय पक्षही याप्रकरणी आपल्या प्रतिक्रया देत आहेत. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंनी याच मुद्यावर ट्विट केले होते, त्यांच्या ट्विटला अभिनेत्री सोनम कपूरने उत्तर दिले आहे. सोनम कपूरचे आदित्य ठाकरे यांच्या ट्विटवर केले ट्विट खूपच व्हायरल होत आहे.

आदित्य ठाकरे यांनी जेएनयू हल्ल्याबद्दल लिहिले, विद्यार्थ्यांवर विरोध करताना केला जाणारा हिंसाचार आणि क्रूरता चिंताजनक असून मग ते जामिया असो किंवा मग जेएनयू असो. विद्यार्थ्यांवर क्रूरता झाली नाही पाहिजे, त्यांना राहू द्या. या गुंडांना कारवाईचा सामना करावा लागेल. वेळेवर आणि लवकरात लवकर विद्यार्थ्यांना न्याय मिळायला हवा. सोनम कपूरने आदित्य ठाकरे यांच्या या ट्विटला उत्तर देताना लिहिले की, अशाच नेत्यांची आम्हाला गरज आहे. आशेचा किरण अजूनही शिल्लक आहे. सोनम कपूरच्या या ट्विटवर लोकांच्या खूप प्रतिक्रिया येत आहेत.

Leave a Comment