आता ‘गगनयान’मधील अंतराळ प्रवाशांना मिळणार देशी जेवण

देशाच्या पहिल्या मानवी अंतराळ मिशन ‘गगनयान’च्या अंतराळ प्रवाशांना अंतराळात भारतीय जेवण मिळणार आहे. डीआरडीओने म्हैसूर येथील डिफेंस फूड रिसर्च लँबने मिशनच्या प्रवाशांसाठी 22 प्रकारचे पदार्थ तयार केले आहेत. मेन्यूमध्ये दाल फ्राय, व्हेज पुलाव, बटाट्यांचा पराठा, पालक पनीर, आलूमटर, उपमा, इडली, पोंगल, दलिया, एगरोल, चिकन रोल, चिकन कोरमा यांचा समावेश आहे.

एवढेच नाही तर शेंगदाणे-गुळाची चिक्की, हलवा, पापड, बिस्किट, काजू, बदाम आणि आक्रोड देखील असतील. चहा, कॉफी आणि फ्रूट ज्यूस सारखे पाउडर दिले जातील.

इस्त्रोबरोबर झालेल्या करारानुसार, डीएफआरएल गगनयानसाठी 60 किग्रा जेवण आणि 100 लीटर पाणी देणार आहे. पदार्थांचे नमूने इस्त्रोला पाठवण्यात आले आहेत. इस्त्रोचे वैज्ञानिक या पदार्थावर सुचना पाठवतील, जेणेकरून गरजेनुसार त्यात बदल करता येईल. वर्ष 2022 मध्ये गगनयान मिशनद्वारे 4 भारतीय अंतराळात पाठवले जातील. ते 7 दिवस अंतराळात राहतील.

डीएफआरएलचे संचालक डॉ. अनिल दत्त सोमवाल यांनी सांगितले की, पृथ्वीच्या तुलनेत अंतराळात प्रवाशांचे चालणे-फिरणे कमी असेल. गुरूत्वाकर्षाच्या कमतरतेमुळे ते नेहमी तरंगत असतील. त्यामुळे त्यांची कॅलरी कमी असेल. तरी देखील सकाळाचा नाश्ता, दुपारी आणि रात्रीच्या जेवणाची तयारी केली जात आहे.

भारतीयांना गरम जेवण आवडते, त्यामुळे त्यांना एक उपकरण दिले जाईल. ज्यामध्ये जवळपास 92 वॉटने जेवण गरम होईल. सर्व जेवण रेडीमेड असेल. जसे की सांभर सोबत इडली. यामध्ये पाणी टाकून प्रवाशी खाऊ शकतील. एकदा पॅकेट खोल्यानंतर 24 तासात जेवण करणे गरजेचे आहे. हे जेवण अर्धे सोडून देता येणार नाही. पॉकेट खोल्यानंतर ते देखील सामान्य जेवणाप्रमाणे होईल.

सोमवाल यांच्यानुसार, अंतराळ प्रवाशांसाठी जेवण झिरो-ग्रॅव्हिटी लक्षात घेऊन तयार करण्यात येत आहे. काही गोष्टी जसे की रोल, हाय एनर्जी बार (चिक्की), बदाम पॉकेट खोलून थेट खाता येईल. मात्र दाल, पुलाव, मटर पनीर, हलवा या गोष्टी गरम पाणी टाकून तयार कराव्या लागतील. कारण पॅकेजिंग वेळी त्यातील पाणी शोषून घेतले जाईल.

Leave a Comment