अर्ध्या तासामध्ये पाचशे कॅलरीज खर्च करणारे काही व्यायामप्रकार


आजकाल वजन घटविण्यासाठी अनेक प्रकारचे व्यायाम सुचविले जातात. पायी चालण्यापासून सायकलिंग, पोहणे, योगासने करणे, एक ना अनेक व्यायामप्रकार लोक अवलंबत आहेत. पण ज्या व्यायामप्रकारांच्या माध्यमातून कमी वेळामध्ये जास्त कॅलरीज खर्च होतील असे व्यायामप्रकार अवलंबल्याने वजन कमी करण्यास मदत मिळेल.

धावणे हा व्यायामप्रकार वजन कमी करण्यासाठी उत्तम समजला जातो. सरासरी ( average ) वजन असणारी व्यक्ती साधारण एक मैल पळल्याने शंभर कॅलरीज खर्च करू शकते. त्यामुळे जितके जास्त मैलांचे अंतर आपण धावू, तितक्या जास्त कॅलरीज आपण खर्च करू शकू. त्यामुळे एकसारख्या वेगाने जर अर्धा तास एखादी व्यक्ती धावत असेल, तर ती व्यक्ती साधारण पाचशे कॅलरीज खर्च करू शकेल. तसेच एक तास सलग दोरीवरच्या उड्या मारल्यानेही साधारण तेराशे कॅलरीज खर्च होऊ शकतात. ह्याचमुळे बहुतेक क्रीडापटू, ते करीत असलेल्या व्यायामप्रकारांमध्ये दोरीवरच्या उड्या ह्या व्यायामाचा समावेश नक्कीच करतात.

इंटरव्हल ट्रेनिंग या प्रकारामध्ये अनेक प्रकारचे व्यायाम समाविष्ट असतात. जोरबैठका ( squats ), बर्पीज, लंजेस इत्यादी प्रकारचे व्यायाम या मध्ये केले जातात. हे व्यायामप्रकार करत असताना, प्रत्येक सेट नंतर काही क्षणांची विश्रांती घ्यावयाची असते. त्यानंतर पुढील व्यायाम सुरु करावयाचा असतो. इंटरव्हल ट्रेनिंग केल्यानेही अर्ध्या तासामध्ये साधारण ४५० कॅलरीज खर्च होतात.

केटलबेल ट्रेनिंग, केटलबेल नावाच्या चहाच्या किटली प्रमाणे दिसणाऱ्या वजनांच्या मदतीने केले जाते. ह्या ट्रेनिंगसाठी वेगवगळ्या वजनाच्या केटलबेल्स चा वापर करता येतो. ह्या व्यायामप्रकाराने वीस मिनिटांमध्ये चारशे पर्यंत ही कॅलरीज खर्च होऊ शकतात, मात्र ह्या व्यायामाने हृदयाच्या ठोक्यांची गती अतिशय जलद होत असल्याने हा व्यायामप्रकार करताना खबरदारी घेणे आवश्यक आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment