या टॉप टेनिस स्टार्सकडे आहेत कोट्यावधींच्या लग्झरी कार्स

जगभरात टेनिस खेळाचे आणि टेनिसपटूंचे अनेक चाहते आहेत आजपासून एटीपी कप सुरू होत आहे. यामध्ये टेनिसपटू रॉजर फेडरर भाग घेणार नाही. मात्र या स्पर्धेत अनेक मोठमोठे टेनिस स्टार सहभागी होणार आहेत. भारतातील क्रिकेटर्सप्रमाणेच या टेनिस स्टार्सकडे अनेक अलिशान गाड्या आहेत. अनेक टेनिसपटू ऑटो कंपन्यांचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर देखील आहेत. या टेनिस स्टार्स आणि त्यांच्या स्पॉन्सर्सविषयी जाणून घेऊया.

Image Credited – Amarujala

राफेल नदाल –

टेनिस स्टार राफेल नदाल किआ मोटर्सचा प्रचार करतो. नदाल किआसोबत 2004 पासून जोडलेला आहे. 2006 ला तो कंपनीचा ग्लोबल ब्रँड अ‍ॅम्बेसेडर झाला. त्याच्या गॅरेजमध्ये एस्टॉन मार्टिन डीबीएस सारख्या अलिशान गाड्या आहेत.

Image Credited – Amarujala

मारिआ शारापोव्हा –

रशियन टेनिस स्टार मारिआ शारापोव्हा पोर्शे कंपनीसोबत 2012 पासून आहे. 2012 मध्ये स्टुटगार्डमध्ये पोर्शे टेनिस ग्रँड प्रिक्स जिंकल्यानंतर तिला पांढऱ्या रंगाची 911 कॅरेरा एस कॅब्रियोलेट गिफ्ट मिळाली होती.

Image Credited – Amarujala

रॉजर फेडरर –

टेनिसपटू रॉजर फेडरर मर्सिडिज बेंझचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे. कंपनी त्याला प्रत्येक 6 महिन्याला कार गिफ्ट करते. त्याच्या आवडत्या कारमध्ये मर्सिडिज बेंझ एलएस, एसएलआरचा समावेश आहे. मागील वर्षी त्याच्या गॅरेजमध्ये CLS 450 4matic Coupe चा देखील समावेश झाला आहे.

Image Credited – Amarujala

सेरेना विलियम्स –

टेनिस स्टार सेरेना विलियम्सच्या पहिल्या कारचे नाव लिनकोलिन नेव्हिगेटर होते आणि 2018 मध्ये ती फोर्ड सारख्या लग्झरी ब्रँडची अ‍ॅम्बेसेडर झाली. लिनकोलिन मोटर्स फोर्डसाठी गाड्या बनवतात. सेरेना याआधी जर्मन कार कंपनी बीएमडब्ल्यू मिनी आणि एस्टॉन मार्टिनसोबत देखील होती. तिच्या कलेक्शनमध्ये लाल रंगाचे बेंतले कॉन्टिनेंटल जीटी, एस्टॉन मार्टिन लांगोडा आणि रेंज रोव्हर देखील आहे.

Image Credited – Amarujala

केई निशीकोरी –

जापानचा टेनिस स्टार निशीकोरीला 2014 मध्ये जॅग्वार कंपनीने आपला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनवले होते. फॉर्ब्सच्या यादीत देखील तो 35व्या स्थानावर आहे. 2019 मध्ये त्याने 37.3 मिलियन डॉलर्सची कमाई केली होती. तो नाइकी, निसिन, जापान एअर लाइन्सचा देखील अ‍ॅम्बेसेडर आहे.  जापान एअर लाइन्सने तर एका विमानाचे नाव त्याच्या नावावरून ठेवले आहे.

Image Credited – Amarujala

नोव्हाक जोकोव्हिच –

सर्बियाचा हा स्टार खेळाडू अनेकवर्षांपासून प्यूजोशी जोडलेला आहे. जर्मन कार ब्रँडस ऑ, बीएमडब्ल्यू, मर्सिडिज बेंझ गाड्या त्याच्या आवडत्या आहेत. ऑडीबरोबर देखील त्याने एक कँम्पेन शूट केले होते.

Image Credited – Amarujala

बियांका अँड्रेस्कू –

कँनेडाच्या या टेनिस स्टारचे जगभरात चाहते आहेत. मागील वर्षीच तिने बीएमडब्ल्यूसोबत करार केला आहे. यूएस ओपन ग्रँड स्लँमचे विजेतेपदक पटकवल्यानंतर बीएमडब्ल्यूने तिला BMW M8 Cabriolet भेट दिली होती.

Leave a Comment