Video : लाईव्ह स्ट्रिमिंगच्या नादात भरधाव कारचा अपघात

गाडी चालवताना वेगमर्यादा पाळणे आणि फोनचा वापर करू नये, अशा सुचना वारंवार केल्या जातात. मात्र या नियमांकडे दुर्लक्ष करून अनेक भरधाव वेगाने गाडी चालवतात, यामुळे मोठे अपघात होतात. अमेरिकेच्या कनेक्टिकट येथील एका कारचालकाला अशाच प्रकारे भरधाव वेगाने गाडी चालवताना लाईव्ह स्ट्रिमिंग करणे चांगलेच महागात पडले आहे.

कनेक्टिकट राज्या पोलिसांनी फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, चालक भरधाव वेगाने गाडी चालवत आहे व त्याचबरोबर मोबाईलद्वारे लाईव्ह स्ट्रिमिंग देखील करत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, चालक ताशी 160 किमीपेक्षा अधिक वेगाने कार चालवत आहे. मात्र कार हायवेवरून दुसऱ्या दिशेला वळताच चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटते व कार क्रॅश होते.

I-95 NB Gold Star Memorial Bridge

Sometimes a Trooper’s accident report writes itself. The operator of this vehicle was kind enough to publicly live stream himself traveling over the Gold Star Memorial Bridge, while driving at reckless speeds prior to being involved in an accident. The posted speed limit for the Gold Star Memorial Bridge is 55 MPH. Speeding and live streaming is not only dangerous, it is illegal. Thankfully, this operator was wearing his seatbelt, or they could have suffered serious injuries. Please slow down and drive safely.

Posted by Connecticut State Police – Troop E Montville on Sunday, December 29, 2019

23 वर्षीय चालक केनेथ हाफ्लरला पोलिसांनी अटक केले आहे. ही घटना गोल्ड स्टार मेमोरियल ब्रिजवरील घडली. या घटनेवेळी पोलीस चालकाचा पाठलाग करत होते. सुदैवाने चालकाने सिटबेल्ट लावला असल्याने या अपघातात कोणतीही गंभीर दुखापत न होता तो वाचला.
या घटनेची माहिती कनेक्टिकट पोलिसांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये दिली.

अपघातातून वाचल्यानंतर 23 वर्षीय चालक केनेथला पोलिसांनी अटक केले आहे. त्याच्यावर बेजबाबदारपणे गाडी चालवणे, विमा नसलेली गाडी चालवणे, अयोग्य वळणे घेणे असे चार्जेस लावण्यात आले आहेत. त्याच्याकडे गांजा देखील आढळला असून, त्याचे लायसन्स रद्द करण्यात आले आहे.

Leave a Comment