बॉलीवूडमधील या चित्रपटांमध्ये होते हार्दिकच्या गर्लफ्रेंडचे आयटम साँग


भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या हा सध्या त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. त्याच्यासोबत आजवर बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्रींचे नाव जोडण्यात आले आहे. अभिनेत्री उर्वशी रौतेलाला हार्दिक डेट करत असल्याच्या चर्चा काही दिवसांपूर्वी रंगल्या होत्या. पण हार्दिक तिचा बॉयफ्रेंड नसल्याचे सांगत अफेअरच्या चर्चांना उर्वशीने पूर्णविराम लावला होता. आता आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर डेट करत असलेल्या अभिनेत्रीचा फोटो हार्दिक शेअर केला आहे.

हार्दिकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नवीन वर्षाच्या मुहूर्तावर अभिनेत्री आणि सर्बियन मॉडेल नताशा स्टेनकोविकसोबतचा फोटो शेअर करत नात्याची कबूली दिली आहे. त्याने फोटो शेअर करत माझ्या फायरवर्कसोबत नवीन वर्षाची सुरुवात, असे कॅप्शन दिले आहे. पण बॉलीवूडच्या कोणत्या चित्रपटात हार्दिकची गर्लफ्रेंड नताशाने काम केले आहे? असा प्रश्न अनेकांना पडला असेल.

आता पर्यंत अनेक चित्रपटांमध्ये नताशाने काम केले आहे. पण अजय देवगण, अमिताभ बच्चन आणि करिना कपूर अभिनीत सत्याग्रह चित्रपटात तिने आयटम साँगवर नृत्य केले आहे. त्यानंतर ती डिजे वाले या गाण्यात देखील दिसली होती. त्यानंतर तिने ‘7 Hours to Go’, ‘फुकरे रिटर्न्स’ चित्रपटातील ओ मेरी मेहबुबा या गाण्यावर नृत्य केले आहे. तसेच तिने छोट्या पडद्यावरील ‘नच बलिये’ या शोमध्ये देखील सहभाग घेतला होता.

नताशाचे बॉलीवूडमधील आयटम साँग
सत्याग्रह

फूकरे

डिजे वाले

द बॉडी

Leave a Comment