राजस्थानातील तळीरामांनी ३१ डिसेंबरच्या रात्री रचला विक्रम


जयपूर : २०१९ वर्ष समाप्त होत आपण २०२० या नवीन वर्षात पदार्पण केले. नव वर्षाचे स्वागत देशात तसेच जगभरात मोठ्या उत्साहात करण्यात आले. कुठे नाचगाणी सुरु होती तर कुठे समुद्र किनारे फुलून गेले होते. तर नववर्षात असंख्य मद्यप्रेमींनी मद्याच्या धुंदीतच पदार्पण केले. यामध्ये राजस्थान देखील मागे नव्हता. राजस्थानमध्ये ३१ डिसेंबरच्या रात्रीपर्यंत १ अब्ज ४ कोटी रुपयांच्या दारूची विक्री झाली. राजस्थानच्या तळीरामांनी हा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

राजस्थान सरकारच्या उत्पादन शुल्क विभागाला दारूच्या वाढत्या विक्रीमुळे कराच्या माध्यमातून खूप मोठा फायदा झाला आहे. २०१८ ची सांगता होताना येथे ६३ कोटी रुपयांच्या दारूची विक्री झाली होती. बिअर विक्रीचा आकडा देखील मोठाच होता. उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवाडीनुसार एकूण १ अब्ज ७१ कोटींच्या दारूची ३० आणि ३१ डिसेंबरला विक्री झाली. ३० डिसेंबरला ६७ कोटी ६७ लाख आणि ३१ डिसेंबरला १०४ कोटी रुपयांची मद्यविक्री झाली. उत्पादन शुल्क विभागाने ही सर्वात मोठी विक्री असल्याचा दावा केला आहे. ३० आणि ३१ डिसेंबरच्या रात्री १ अब्ज ७१ कोटी रुपयांच्या मद्यविक्रीत ४० कोटी रुपयांची बिअर आणि १ अब्ज ३१ कोटी रुपयांची इंग्लिश मद्यविक्री झाली. नव्या वर्षातही पिणे आणि पाजण्याचे प्रमाण थांबले नव्हते.

Leave a Comment