मंत्रालयातील त्या ‘अनलकी’ केबिनवर अजित पवारांचे भाष्य


मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील 602 क्रमांकाची केबिन मी नाकारली नसून अंधश्रद्धा पवार कुटुंब मानत नसल्याचे स्पष्ट केले आहे. गेल्या पाच वर्षांपासून राजकीय कारकीर्दीसाठी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील कृषीमंत्र्यांची केबिन ‘अनलकी’ ठरत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अजित पवारांनी त्यावर थेट मोबाईलमधील यादी वाचत स्पष्टीकरण दिले.

माझ्या केबिनजवळ सीताराम कुंटे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दालन आहे. मी 602 क्रमांकाची केबिन नाकारली नाही. त्यांना वरिष्ठतेनुसार मी केबिन देण्यास सांगितले होते. 2020 सुरु झाले आहे. 21 व्या शतकात कोणीही शापित वगैरे गोष्टी मानत नाही. अंधश्रद्धांवर पवार कुटुंब विश्वास ठेवत नाही. वरिष्ठ नेत्यांप्रमाणे मी क्रम लावायला सांगितल्याचे म्हणत अजित पवार थेट मोबाईलमधील यादी दाखवायला सरसावले. आधी मला, मग अशोक चव्हाण, त्यानंतर दिलीप वळसे पाटील आणि शेवट राज्यमंत्र्यांवर केला, असे अजित पवारांनी स्पष्ट केले.

Leave a Comment