आरबीआयच्या अ‍ॅपमुळे दृष्टीहिनांना बनावट नोटा ओळखणे होणार सोपे

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) नेत्रहीन लोकांसाठी एक खास मोबाईल अ‍ॅप मानी (Mobile Aided Note Identifier) लाँच केले आहे. या अ‍ॅपच्या मदतीने लोक सहज बनावटी नोटांची ओळख करू शकतील.

आरबीआयचे हे अ‍ॅप नोटांची तपासणी करून सांगेल की नोट कितीची आहे आणि खरी आहे की नाही. गुगल प्ले स्टोरवरून हे अ‍ॅप डाउनलोड करता येईल. या अ‍ॅपची खास गोष्ट म्हणजे हे नोटांची ओळख योग्यरित्या करते व त्याची माहिती साउंडद्वारे देते.

आरबीआयचे हे अ‍ॅप युजर्सला नोटांची माहिती अगदी अचूकरित्या देते. याशिवाय यामध्ये ऑडिओ सेंसर सपोर्ट मिळेल. ज्यामुळे युजर्स या अ‍ॅपला आवाजाने कंट्रोल  करू शकतील. जर नोट दुमटलेली असेल, तर याविषयी देखील अ‍ॅप माहिती देईल. मानी अ‍ॅप इंटॅग्लियो प्रिटिंग, टेक्सटटाइल मार्क, आकार, नंबर, रंग आणि मोनोक्रोनिक पॅटर्नचा सहज तपास करेल.

Leave a Comment