
2019 हे वर्ष बॉलिवूडसाठी कमाई बाबतीत खास होते. यावर्षी अनेक हिंदी चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. अशाच टॉप-10 चित्रपटांविषयी जाणून घेऊया ज्यांनी यावर्षी सर्वाधिक कमाई केली आहे.

वॉर (474.79 कोटी रुपये)
सिद्धार्थ आनंदद्वारे दिग्दर्शित आणि ह्रतिक रोशन आणि टायगर श्रॉफची प्रमूख भूमिका असलेला ‘वॉर’ एक एक्शन थ्रिलर होता. कमाईच्या बाबतीत हा चित्रपट 2019 मध्ये टॉपवर आहे.

कबीर सिंह (379.02 कोटी रुपये)
कबीर सिंह हा तेलगू चित्रपटाचा रिमेक आहे. 2019 मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. यात शाहिद कपूर आण कियारा आडवाणीची प्रमुख भूमिका आहे.

उरी- द सर्जिकल स्ट्राईक (342.06 कोटी रुपये)
विक्की कौशलचा हा चित्रपट उरी हल्ल्यावर आधारित होता. 2019 मध्ये सर्वोत्तम चित्रपट असलेला हा चित्रपट कमाईच्या बाबतीत देखील तिसऱ्या स्थानावर आहे.

भारत (325.58 कोटी रुपये)
कॅटरिना कैफ आणि सलमान खानचा हा चित्रपट भलेही समीक्षकांना आवडला नसेल, मात्र कमाईच्या बाबतीत हा चित्रपट चौथ्या स्थानावर राहिला.

मिशन मंगल (290.02 कोटी रुपये)
विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा आणि अक्षय कुमार सारखी जबरदस्त स्टारकास्ट असलेला हा चित्रपट 2019 मध्ये कमाईच्या बाबतीत 5व्या स्थानावर आहे.

हाऊसफूल (278.78 कोटी रुपये)
अक्षय कुमार, बॉबी देओल, रितेश देशमुख, कीर्ति खरबंदा, कृति सेनन आणि पूजा हेगडे यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. फिल्म कमाईच्या बाबतीत 2019 मध्ये सहाव्या स्थानावर आहे. चित्रपटातील ‘बाला, बाला, बाला’ हे गाणे देखील खूप गाजले.

गल्ली बॉय (238.16 कोटी रुपये)
जोया अख्तरद्वारे दिग्दर्शित हा चित्रपट एका रॅपरची कथा आहे. यामध्ये आलिया भट्ट आण रणवीर सिंहची प्रमूख भूमिका आहे. कमाईच्या बाबतीत हा चित्रपट 7व्या स्थानावर आहे.

टोटल धमाल (228.27 कोटी रुपये)
या चित्रपटाद्वारे अनेक काळानंतर अनिल कपूर आणि माधुरी दिक्षित ही जोडी पुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळाली. या वर्षी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये हा 8व्या स्थानावर आहे.

छिछोरे (212.67 कोटी रुपये)
श्रध्दा कपूर आणि सुशांत सिंह राजपूत यांची प्रमूख भूमिका असलेला हा चित्रपट मित्रांची गोष्ट आहे. हा चित्रपट यंदाच्या वर्षी कमाईच्या बाबतीत 9व्या स्थानावर आहे.

सुपर 30 (208.93 कोटी रुपये)
गणितज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाने सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये 10वे स्थान मिळवले आहे. या चित्रपटात ह्रतिक रोशनची प्रमुख भूमिका होती.