व्हायरल; इस्त्रोच्या बैठकीत डायरेक्टरने वाजवली चक्क बासरी

Image Credited – Indiatimes

इस्त्रोने मागील काही वर्षात अभुतपुर्व यश मिळवले आहे. वैज्ञानिकांनी जगभरात देशाचे नाव उंचावले आहे. विज्ञानाबरोबरच इस्त्रोचे वैज्ञानिक कलेत देखील मागे नाहीत. याचे ताजे उदाहरण नुकत्याच पार पडलेल्या इस्त्रोच्या संसदीय स्थायी समितीमध्ये पाहायला मिळाली. यावेळी बैठकीत यूआर राव सेटेलाईट सेंटरचे डायरेक्टर पी कुन्हीकृष्णन यांनी बासरी वाजवून सगळ्यांचे मन जिंकले.

वर्ष 2019 च्या अखेरच्या बैठकीत इस्त्रोचे प्रमुख के. सिवन देखील उपस्थित होते. राज्यसभेचे खासदार जयराम रमेश यांनी ट्विट करून हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, याला आतापर्यंत 30 हजारांपेक्षा अधिक जणांनी पाहिले आहे.

पी. कुन्हीकृष्णन यांनी पीएसएलव्ही प्रोजेक्टमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.

सोशल मीडियावर देखील युजर्सला कुन्हीकृष्णन यांचे बासरी वादन खूपच आवडले असून, युजर्स त्यांचे कौतूक करत आहेत.

Leave a Comment