अरेच्चा ! 50 लाखांच्या टेस्लाच्या बहुचर्चित ट्रकची अवघ्या 1 लाखात बनवली प्रतिकृती

Image Credited – Amarujala

टेस्ला कंपनीने काही दिवसांपुर्वीच आपला इलेक्ट्रिक सायबर ट्रक लाँच केला होता. या ट्रकविषयी जगभरात जोरदार चर्चा झाली होती. 25 लाख रुपये किंमत असणाऱ्या या ट्रकच्या सुरूवातीच्या मॉडेलसाठी 5 दिवसात 1.85 लाख ऑर्डर आले होते. या सायबर ट्रकची डिलिव्हरी 2021 पासून सुरू होणार आहे.

या ट्रकची खास गोष्ट म्हणजे हा ट्रक केवळ 2.9 सेंकदात ताशी 0 ते 60 किमीचा वेग पकडतो. एकीकडे या ट्रकची जोरदार चर्चा सुरू असताना रशियामध्ये एका युट्यूबरने या ट्रक सारखा दिसणारा हुबेहुब ट्रक तयार केला आहे.

युट्यूबर पुष्का गराज युट्यूबवर लोकप्रिय असून, तो कमी किंमतीत कार मॉडिफाय करण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याने सायबर ट्रक बनवण्यासाठी रशियन कारमेकर अवतोवॅजच्या Lada Samara हॅचबॅकची निवड केली.

यासाठी पुष्काच्या ग्रुपने 1300 डॉलर खर्च केले व हा ट्रक 7 लाखांना विकला देखील. त्यांनी सायबर ट्रकला हबकॅप्स लावले, याशिवाय मागील बाजूला हॉरिझॉन्टल बीम ब्रेक लाइट देखील लावली. हे दोन्ही ट्रक सारखेच दिसत असले तरी यात छोटासा फरक आहे. टेस्लाचा सायबर ट्रक इलेक्ट्रिक आहे. तर हा ट्रक पेट्रोलवर चालतो.

बनविण्यात आलेल्या या ट्रकच्या बाजूला कोणतेच दरवाजे नाहीत. तर सायबर ट्रकला 4 दरवाजे आहेत. त्यांनी Lada Samara कारमध्ये फ्रेम बनविण्यासाठी स्टीप पाइप्सचा वापर केला. त्यांनी धातूची शीट्स आणून त्याला वेल्डिंग केले व सायबरट्रकची कॉपी तयार केली. एवढेच नाही तर त्यांनी आर्मर ग्लास बनविण्याचा देखील प्रयत्न केला.

टेस्लाच्या सायबर ट्रकमध्ये 6 लोक बसू शकतात. यात 17 इंच टचस्क्रीन देखील मिळेल. हा ट्रक 400 किमी, 500 किमी आणि 800 किमी या तीन बॅटरी रेंजमध्ये येतो. याची किंमत 28 लाख ते 50 लाख रुपयांपर्यंत आहे.

Leave a Comment