बिग बॉसची स्पर्धक हिना खानने शेअर केले बोल्ड फोटो


आपल्या हटके आणि बोल्ड लूकमुळे प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि एक्स बिग बॉस स्पर्धक हिना खानची सोशल मीडियावर कायम चर्चा होत असते. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर आता हिना खान पुन्हा एकदा आपल्या हॉट लूकमुळे सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.

View this post on Instagram

Hey y’all !

A post shared by Hina Khan (@realhinakhan) on


आपला बॉयफ्रेंड रॉकीसोबत हिना खान मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटताना पाहायला मिळत आहे. आपले प्रत्येक अपडेट्स हिना आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर करते.


आपल्या सोशल मीडियावर प्रसिद्ध टीव्ही क्वीन हिना खानने काही फोटो अपलोड केले आहेत. हिनाचा बोल्ड आणि हटके अंदाज या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.


तिचे चाहते तिच्या बोल्ड अदांपुढे पुरते घायाळ झाले आहेत. हे फोटोशूट बीचवर केल्याचे दिसत आहे. हिनाच्या पाठीवर रेती लागल्याचे यामध्ये दिसत आहे. ग्लॅमरस मेकअप विनाशेअर केलेल्या या फोटोंमध्ये हिनाचा ह्या हॉट लूकवर नेटकरी फिदा झाले आहेत.


सोशल मीडियावर हिना सर्वाधिक सक्रिय असते. रोज हजारोंच्या लाईक्स आणि कमेंट्स तिच्या फोटोंवर येत असतात. जवळपास 5 लाखांहून अधिक लाईक्स 2 हजार कमेंट्स हिनाच्या या फोटोंना आल्या आहेत.


‘ये रिश्ता क्या कहलाता है’ आणि ‘कसौटी जिंदगी की’ या टीव्ही मालिकांतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री हिना खानची कान फिल्म फेस्टिवलमध्ये जाणारी पहिली टीव्ही अभिनेत्री ओळख आहे. चाहते तिच्या हा हॉट अदांवर घायाळ झाले आहेत.

Leave a Comment