नवीन वर्षात कसोटी क्रिकेटच्या सर्वात जुन्या नियमांत होणार बदल


दुबई : एक काळ असा 5 दिवसांच्या कसोटी सामन्यांचा निकाल लागत नसे. पण आता परिस्थिती वेगळी असून सध्या जवळपास प्रत्येक कसोटी सामन्याचा निकाल लागतो. त्यातच असे काही मोजके सामने जो अनिर्णीत राहतात. त्याचबरोबर आता कसोटी सामने हे पाच दिवसांच्या आधीच संपतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (आयसीसी) हा ट्रेंड पाहता मोठा निर्णय घेतला आहे. कसोटी सामन्यातील सर्वात महत्त्वाचा नियम आयसीसी बदलणार आहे.

4 दिवसांच्या कसोटी सामन्यासाठी दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेने 2 वर्षांपूर्वी 2017मध्ये केलेल्या चार दिवसीय कसोटी सामन्याच्या मागणीस परवानगी दिली होती. दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्यात हा कसोटी सामना खेळला गेला आणि अवघ्या 2 दिवसात हा सामना संपला. हा सामना दक्षिण आफ्रिकेने डाव आणि 120 धावांनी जिंकला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद 2020मध्ये जगातील सर्व बोर्डाच्या अधिकाऱ्यांसमवेत एक बैठक घेणार आहेत. यामध्ये कसोटी सामन्यांचे दिवस कमी करण्याचा विचार केला जाणार आहे. या संदर्भातील वृत्त ईएसपीएन क्रिकइन्फो या संकेतस्थळाने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, 2023पासून होणाऱ्या टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये कसोटी सामने हे 5 दिवसांचे नसून 4 दिवसांचे असावेत का यावर या बैठकीत चर्चा होईल. तथापि, आयसीसीच्या या प्रस्तावाला जगभरातील क्रिकेटपटू विरोध करू शकतात.

कसोटी सामने जर चार दिवसांचे असतील आणि 2015 ते 2023च्या क्रिकेट वेळापत्रकानुसार सामने झाल्यास इतर क्रिकेट बोर्डाकडे 335 शिल्लक राहतील. या शिल्लक दिवसांमध्ये आणखी कसोटी सामने खेळले जाऊ शकतात. तसे, जर कसोटी सामने 4 दिवस केले तर एका दिवसात 90 ऐवजी 98 षटके टाकली जातील. मुख्य म्हणजे 2018पासून आतापर्यंत 60 टक्के सामने हे चार दिवसांआधीच संपले आहेत. त्यामुळेच हा विचार आयसीसीच्या वतीने करण्यात आला आहे.

Leave a Comment