अ‍ॅक्सिस बँकेच्या कर्मचाऱ्याने महाराष्ट्राला काय करावे हे शिकवू नये


मुंबई – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी अ‍ॅक्सिस बँकेतील खाती राष्ट्रीयकृत बँकेत वळवण्याच्या निर्णयावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी त्यांच्या टीकेला खरमरीत उत्तर दिले आहे. अ‍ॅक्सिस बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या कक्षेत महाराष्ट्रानं काय करावे, हे शिकवणे येत नसल्याचे म्हणत चतुर्वेदी यांनी अमृता फडणवीस यांना उत्तर दिले आहे.

अ‍ॅक्सिस बँकेतील खाती राष्ट्रीयकृत बँकेत ठाणे महापालिकेने वळवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर असाच निर्णय राज्य सरकारही घेण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त समोर आले आहे. अमृता फडणवीस यांनी या निर्णयावर आक्षेप घेत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. वाईट नेता मिळणे यात महाराष्ट्राची चूक नाही, पण त्या नेत्यासोबत राहणे हे मात्र चुकीचे असल्याचे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले होते. शिवसेनेच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट करून अमृता फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.


प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, शेवटची पण, छोटी नसलेली अमृता फडणवीस यांना सूचना आहे. नक्कीच एका अ‍ॅक्सिस बँकेच्या कर्मचाऱ्याचे महाराष्ट्राला परिक्षण करून महाराष्ट्राने काय करावे याचा हे शिकवण्याचे काम नाही. मी महाराष्ट्र सरकारला त्याची मुलाखत वाचून विनंती करते की, अ‍ॅक्सिस बँकेत खाते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना कोणत्या परिस्थिती वळवण्यात आले, याची चौकशी करावी. त्याचबरोबर अ‍ॅक्सिस बँकेत खाते वळवण्यात आल्यानंतर अ‍ॅक्सिस बँकेकडून भाजपच्या योजनांसाठी सीएसआर निधी देण्यात आला होता की नाही, याचीही चौकशी करावी, अशी मागणी चतुर्वेदी यांनी केली आहे.

Leave a Comment