ठाकरे सरकारचा उद्या मंत्रिमंडळ विस्तार, यांना भेटू शकते मंत्रिपद


मुंबई – महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून स्थापन केलेल्या महाविकास आघाडी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार उद्या पार पडणार आहे. अजित पवार या मंत्रिमंडळ विस्तारात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मंत्रिमंडळ विस्तारात उद्या कोण मंत्रिपदाची शपथ घेणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर तब्बल महिनाभरानंतर महाराष्ट्र विकासआघाडीचे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळ स्थापनेवेळी उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी दोन मंत्र्यांनी शपथ घेतली.

आठ ते नऊ नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळ विस्तारात संधी दिली जाणार आहे. राष्ट्रवादीचे ११, तर शिवसेनेचे १२ ते १३ मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. यात काँग्रेस ७ ते ८ सदस्य राहण्याची शक्यता आहे. त्यामध्ये ८ कॅबिनटे आणि दोन राज्यमंत्री शपथ घेणार आहेत. मंत्रिपदासाठी विजय वडेट्टीवार, के. सी. पाडवी, सुनील केदार, यशोमती ठाकूर, विश्वजीत कदम, अमित देशमुख, वर्षा गायकवाड यांच्या नावाची चर्चा आहे. यापूर्वी मंत्री राहिलेल्यांना आता मंत्री करू नका अशी मागणी तरूण आमदारांनी केली आहे. यावेळी तरूण चेहऱ्यांना संधी द्यावी अशी इच्छा पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त करण्यात आली आहे.

ठाकरे सरकारमधील संभाव्य मंत्र्यांची यादी
राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, बाळासाहेब पाटील, राजेश टोपे, दत्ता भरणे, किरण लहामटे, नवाब मलिक, अनिल देशमुख, डॉ. राजेंद्र शिंगणे,

काँग्रेस – के. सी. पाडवी, अशोक चव्हाण, अमित देशमुख, विश्वजित कदम, प्रणिती शिंदे, सतेज पाटील, विजय वड्डेटीवार, यशोमती ठाकूर, अमिन पटेल, वर्षा गायकवाड

शिवसेना – रविंद्र वायकर किंवा सुनील प्रभू, अनिल परब, सुनील राऊत, प्रताप सरनाईक, डॉ. बालाजी किणीकर, उदय सामंत, दीपक केसरकर, भास्कर जाधव किंवा वैभव नाईक, आशिष जैस्वाल किंवा संजय रायमुलकर, बच्चू कडू, संजय राठोड, गुलाबराव पाटील, दादा भुसे, सुहास कांदे, अब्दुल सत्तार किंवा संजय शिरसाट, डॉ. संदीपन भुमरे, राहुल पाटील, तानाजी सावंत, शंभूराजे देसाई, प्रकाश आबिटकर

Leave a Comment