नितीन नांदगावकर पुन्हा अॅक्टिव्ह; रिक्षाचालकांना ‘खळ्ळखट्याक’चा इशारा


ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे डॅशिंग नेते नितीन नांदगावकर यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत दाखल झाले होते. त्यानंतर आता शिवसेना नेते नितीन नांदगावकर हे पुन्हा अॅक्टिव्ह झाले असून रिक्षा चालकांना त्यांनी खळखट्याकचा इशारा दिला आहे. रिक्षाचालक रिक्षाचे भाडे वाढवण्यासाठी मीटरमध्ये करीत असलेले बेकायदेशीर कृत्याविरोधात नांदगावकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. नितीन नांदगावकरांनी फेसबुकवर मुलुंडमधील चेक नाक्यावरील एका रिक्षाचे प्रात्यक्षिक दाखवणार व्हिडीओही अपलोड केला आहे.

या व्हिडीओमध्ये रिक्षाचालक मीटर वाढवण्यासाठी कशाप्रकारे बेकायदेशीर कृत्य करत असल्याचे उघड केले आहे. तसेच या रिक्षाची त्यांनी तोडफोड केली आहे. रिक्षा मराठी भाषिकाची आहे. प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या रिक्षाचालकांच्या दररोज रिक्षा फोडणार असा इशाराही नितीन नांदगावकरांनी दिला आहे.

ज्या ज्या ठिकाणी मुंबईत GST बटण असलेल्या रिक्षा दिसतील. त्या सर्व ठिकाणच्या रिक्षा रोज फोडणार. मुंबईत अशाप्रकारे GST बटण असलेल्या रिक्षा चालू देणार नाही. किती जणांवर गुन्हे दाखल करणार, जनतेची लुटमार थांबणार की नाही? असा प्रश्नही त्यांनी व्हिडीओद्वारे उपस्थित केला आहे.

त्यांनी या व्हिडीओसह एक फेसबुक पोस्टही लिहिली आहे. सर्वसामान्य जनतेच्या जीवनातील प्रवासातील रिक्षा एक अविभाज्य भाग, एक विश्वासाचे नाते. पण त्यात आली बेईमानी ती सर्वसामान्य जनतेला लुटण्यासाठी बनवली गेली. बघता बघता मुलुंड मधील चेकनाक्यावर सर्रास सर्वच रिक्षामध्ये आले घोडा मीटर. सर्व जाती धर्माची लोक जेव्हा आपल्याच लोकांना लुबाडायला लागली तर अशा वेळी जनतेने सुद्धा गप्प राहून चालणार नाही. प्रत्येकाने पुढे येऊन विरोध केला पाहिजे, असे नितीन नांदगावकर यांनी फेसबुक पोस्टवर म्हटले आहे.

Leave a Comment