रशियन लष्करात दाखल झाले जगातील पहिले हायपरसॉनिक मिसाईल


मॉस्को – आवाजापेक्षा 27 पट वेगवान असे अवनगार्ड हायपरसॉनिक मिसाईल रशियाने आपल्या लष्करात समाविष्ट केले आहे. एखाद्या देशाच्या लष्करात सामिल होणारे हे जगातील पहिलेच हायपरसॉनिक मिसाईल आहे. यासंदर्भातील घोषणा करताना हे मिसाइल अण्वस्त्रवाहक असल्याचे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले.

आवाजाच्या गतीपेक्षा किमान 20 पट अधिक वेगाने मारा करण्यास हे मिसाईल सक्षम आहे. पुतिन यांनी सांगितल्याप्रमाणे, हे मिसाइल एवढे वेगवान आहे की कुठल्याही रडारमध्ये पकडले जाणार नाही किंवा कुठलीही क्षेपणास्त्ररोधी यंत्रणा याला थांबवू शकणार नाही.

रशियाचे संरक्षण मंत्री सेर्जी शोइगू म्हणाले, की हे मिसाईल 27 डिसेंबर 2019 रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता लष्करात सामिल करण्यात आले. नेमके कुठे हे मिसाइल तैनात केले जाणार याची माहिती गुप्त ठेवली जाईल. तरीही अवनगार्ड क्षेपणास्त्र यूरलच्या डोंगराळ भागात तैनात केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment