महिंद्रांनी शेअर केलेला व्हिडीओ तुम्हाला स्मार्टफोनच्या प्रेमात पाडेल

Image Credited – India Today

आज स्मार्टफोन आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्ट झाली आहे. काही लोक या डिव्हाईसचा अति वापर करतात. मात्र हेच डिव्हाईस अनेकदा चांगल्या कामासाठी देखील वापरले जातात. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी असाच एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ बघून तुम्ही स्मार्टफोनच्या प्रेमात नक्की पडाल.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एका मिठाईच्या दुकानाबाहेर एक व्यक्ती बसलेला आहे. त्याच्या हातात मोबाईल फोन आहे. हा व्यक्ती व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून साइन लँग्वेजद्वारे कोणाशीतरी बोलत आहे. हे केवळ स्मार्टफोनद्वारेच शक्य आहे. कारण साध्या फोनद्वारे दिव्यांगाना साइन लँग्वेजद्वारे बोलणे शक्यच नव्हते.

आनंद महिंद्रा यांनी व्हिडीओ शेअर करत लिहिले की, आपण नेहमी टीका करतो की मोबाईल उपकरणांनी जगाला आपल्या कक्षेत घेतले आहे. मात्र आपण सर्वांनी स्वतःला आठवण करून दिली पाहिजे की या उपकरणांमुळे आपल्या सर्वांसाठी कम्युनिकेशनचे एक जग उघडले आहे.

आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, आतापर्यंत दीड लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर 20 हजारांपेक्षा अधिक जणांनी लाईक केला आहे.

युजर्स देखील या व्हिडीओ आणि मोबाईल तंत्रज्ञानाचे कौतूक करत आहेत.

Leave a Comment