ही टीव्ही अभिनेत्री साकारणार मलाला युसुफझाई


या दशकातील सर्वात प्रसिध्द टीनएजर म्हणून संयुक्त राष्ट्राने जिच्या नावाची घोषणा केली त्या शांततेच्या नोबेल पुरस्काराची विजेती पाकिस्तानची मलाला युसुफझाई हिच्यावर बनत असलेल्या चित्रपटात टीव्ही अभिनेत्री रिम शेख मलालाची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षाच्या ३१ जानेवारी २०२१ ला रिलीज होणार आहे. अन्य कलाकारात दिव्या दत्ता, अतुल कुलकर्णी, मुकेश ऋषी आणि पंकज त्रिपाठी यांचा समावेश आहे. जयंतीलाल गाढा यांच्या पेन व टेक्नो फिल्म्स तर्फे या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन एच ए अमजदखान करणार आहेत.

मलाला हिला लहानपणापासून मुलींच्या शिक्षणाबाबत आस्था होती आणि बीबीसीवर ती गुल मकई या नावाने उर्दू ब्लॉग लिहीत असे. तिच्यावर तयार होत असलेल्या चित्रपटाचे नाव गुल मकई असेच आहे. तालिबानी राजवटीला या ब्लॉगच्या माध्यमातून विरोध केल्यामुळे तिच्यावर ती शाळेत जात असताना तालिबानी दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता त्यात ती गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर तिच्या कुटुंबाने ब्रिटन मध्ये आश्रय घेतला आहे.

Leave a Comment