तुम्ही पाहिला आहे रिंकुचा बिनधास्त, बोल्ड लूक


गणेश पंडित दिग्दर्शित आणि रिंकु राजगुरु अभिनीत ‘मेकअप’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मेकअप’च्या जबरदस्त टिझरनंतर आता सोशल मीडियावर या चित्रपटाचे पोस्टर पोस्ट करण्यात आले आहे. काचेच्या इमारतीजवळ पारंपरिक वेशात उभ्या असणाऱ्या रिंकू राजगुरूचे प्रतिबिंब एका वेगळ्याच वेशात या पोस्टरमध्ये दिसत आहे.

View this post on Instagram

💄👡💅🙋‍♀️पुर्वी

A post shared by Rinku Mahadeo Rajguru (@iamrinkurajguru) on


कधी कधी माणसाचे प्रतिबिंब हे त्यांच्या मूळ व्यक्तिमत्वापेक्षा जास्त बोलके असते. त्यामुळे समोरची व्यक्तीही संभ्रमात पडते, की नक्की खरे कोण? प्रेक्षकांचीही काहीशी अशीच अवस्था हे पोस्टर बघून झाली असेल. पण डोक्याला जास्त त्रास देऊ नका, कारण यात रिंकूचे दोन वेगळे चेहरे दिसणार आहेत.

यात समाजासमोर वावरणारा पूर्वीचा म्हणजेच रिंकूचा सोज्वळ, समंजस चेहरा तिच्या स्वतःच्या विश्वात मात्र पूर्णपणे वेगळा आहे. तिच्या जगण्याची बिनधास्त, बोल्ड, स्पष्टवक्ती, स्वच्छंदी आयुष्य जगणारी अशी दुसरी बाजू आहे. परंतु पूर्वीने हा ‘मेकअप’ का केला असेल, हे मात्र चित्रपट आल्यावरच कळेल. ‘मेकअप’ या चित्रपटात रिंकू राजगुरू सोबतच चिन्मय उदगीरकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ७ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment