वरुण धवन – नोरा फतेहीचे ‘स्ट्रीट डान्सर’मधील ‘गरमी’ गाणे रिलीज


नववर्षाच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांच्या भेटीला रेमो डिसुजा यांचं दिग्दर्शन असलेला ‘स्ट्रीट डान्सर थ्री डी’ हा चित्रपट येणार आहे. सिनेरसिकांचा या चित्रपटाच्या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर, सोशल मीडियावर वरुण धवन, श्रद्धा कपूर आणि प्रभू देवा यांच्यावर चित्रीत झालेले ‘मुकाबला’ हे गाणेदेखील बऱ्यापैकी हिट झाले आहे. आता नुकतेच नोरा फतेही आणि वरुणची हॉट केमेस्ट्री असलेले ‘गरमी’ हे गाणे रिलीज करण्यात आले आहे.

हे गाणे बादशाहने लिहिले असून त्यानेच या गाण्याला संगीत देखील दिले आहे. तर हे गाणे नेहा कक्कर आणि बादशाहने गायले आहे. तर, या गाण्याची कोरिओग्राफी रेमोने केली आहे. ‘स्ट्रीट डान्सर थ्री डी’ हा ‘एबीसीडी’ सिरीजचा तिसरा भाग आहे. यामध्येदेखील धमाल डान्सची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे.

हा चित्रपट हिंदीसह तेलुगू आणि तमिळ भाषेतही रिलीज करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. भूषण कुमार, दिव्या खोसला कुमार, क्रिश्नन कुमार आणि लिझेले डिसूजा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून हा चित्रपट २४ जानेवारीला रिलीज होणार आहे.

Leave a Comment