नक्की काय आहे डिटेंशन सेंटर?

Image Credited – Business Insider

देशभरात नागरिकत्व कायदा 2019 (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक रजिस्टर (एनआरसी) वरून सध्या जोरदार विरोध प्रदर्शन सुरू आहे. कोणी सीएएच्या बाजूने तर कोणी विरोधात आंदोलन करत आहे. या सर्वात सर्वाधिक चर्चेचा आणि विवादास्पद मुदा हा डिटेंशन सेंटरचा आहे. पंतप्रधान मोदींनी देखील डिटेंशन सेंटरचा उल्लेख केला. हे डिटेंशन सेंटर नक्की काय असते ते जाणून घेऊया.

काय आहे डिटेंशन सेंटर  ?

डिटेंशन सेंटर अशा जागेला म्हणतात जेथे गैर कायदेशीरित्या देशात घुसणाऱ्या परदेशी नागरिकांना ठेवले जाते. थोडक्यात, भारतात राहणारे असे लोक जे येथील नागरिक नाही. त्यांच्याकडे कागदपत्रे देखील नाहीत. त्यांची ओळख पटल्यावर त्यांना डिटेंशन सेंटरमध्ये ठेवले जाऊ शकते.

हे नागरिक कोणत्या देशांचे आहे हे समजल्यावर पुन्हा त्यांना डिटेंशन सेंटरमध्ये पाठवले जातात. अनेक देशात डिटेंशन सेंटर आहेत.

परदेशी कायदा 1946 च्या सेक्शन 3 (2) नुसार, भारत सरकारकडे अवैधरित्या राहणाऱ्या परदेशी नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठवण्याचा अधिकार आहे. या कायद्याच्या सेक्शन 3 (2) (ई) मध्ये तरतूद आहे की, कोणीही राज्य डिटेंशन सेंटर बनवू शकते.

जगातील पहिले डिटेंशन सेंटर –

युरोपियन इतिहासकारांनुसार, पहिले डिटेंशन सेंटर 1417 मध्ये बनवण्यात आले होते. फ्रान्सचा राजा चार्ल्स पंचमने बनवले होते. आज या सेंटरला बेसिले सेंट एंटोनी नावाने ओळखले जाते. वर्ष 1789 मध्ये फ्रान्स क्रांतीच्या वेळी डिटेंशन सेंटरवर हल्ला देखील करण्यात आला होता.

कोणत्या देशात आहे डिटेंशन सेंटर –

जगात सर्वाधिक डिटेंशन सेंटर अमेरिकेत असून, येथे 1892 मध्ये न्यूजर्सी येथे पहिले डिटेंशन सेंटर बनवले होते. यूरोप (वर्ष 1970), दक्षिण आफ्रिका (वर्ष 1982) आणि इस्त्रायलमध्ये (2012) डिटेंशन सेंटर बनवण्यात आले.

भारतातील डिटेंशन सेंटर –

बीबीसीच्या रिपोर्टनुसार, भारतात जगातील दुसरे सर्वात मोठे डिटेंशन सेंटर बनवण्यात येत आहे. याची निर्मिती डिसेंबर 2018 पासून आसामच्या ग्वालपाडा जिल्ह्यातील माटिया येथे सुरू आहे.

जवळपास 2.5 हेक्टर जमिनीवर याचे निर्मिती सुरू आहे. यामध्ये 3 हजार लोकांना ठेवले जाऊ शकते. याचे जवळपास 70 टक्के काम पुर्ण झाले आहे.

भारतात आधीपासूनच डिटेंशन सेंटर –

आतापर्यंत आसामच्या जेलमध्येच डिटेंशन सेंटर्स चालवले जात आहेत. वेगळे डिटेंशन सेंटर्स नाही. गृह राज्यमंत्री जीके रेड्डी यांच्यानुसार डिटेंशन सेंटर्समध्ये 1133 घोषित परदेशी नागरिकांना ठेवण्यात आलेले आहे.

Leave a Comment