‘छपाक’ टीमने शेअर केला एक खास संदेश देणारा व्हिडिओ


लवकरच ‘छपाक’ चित्रपटातून बॉलिवूडची मस्तानी म्हणजेच दीपिका पादुकोण प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटात दीपिकाबरोबरच अभिनेता विक्रांत मेस्सीदेखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे. प्रेक्षकांचा ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ‘छपाक’ची टीम सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असतानाच एक खास संदेश देणारा व्हिडिओ दीपिकाने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.


अ‌ॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या तरुणींवर आधारित ‘छपाक’ हा चित्रपट आहे. या चित्रपटात अ‌ॅसिड हल्ल्यातून बचावलेली लक्ष्मी अग्रवालची कथा पाहायला मिळणार आहे. हा व्हिडिओ शेअर करून दीपिकाने ‘बदलाव की नींव शुरुवात होती है, बदलना है’, असे कॅप्शन दिले आहे. हा चित्रपट १० जानेवारीला रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केले आहे.

Leave a Comment