संभाजी भिडे महिलांच्या नादीही लागू नका, जड जाईल तुम्हाला


पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांच्या टीका करताना तुमच्यासारखी माणसे महाराष्ट्राच्या मातीत असने हे दुर्देवच असून महिलांच्या नादीही लागू नका, जड जाईल तुम्हाला, असा इशारा दिला आहे. भिडे यांनी सांगलीमधील एका कार्यक्रमामध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याबद्दल बोलताना गरोदर स्त्रियांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.


मुले न होणाऱ्या महिलांचा उल्लेख भिडे यांनी ‘वांझ’ असा केला होता. चाकणकर यांनी त्यावरुन भिडे यांच्यावर टीकास्र सोडले आहे. संभाजी भिडे स्ञीत्व, अस्तित्व, मातृत्व हि शब्द तुमच्यासाठी फार अनाकलनीय आहेत, पेलणार नाही तुम्हाला, उच्चारू नका आणि नादी ही लागू नका, जड जाईल, असा टोला महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस शिल्पा बोखडे यांनीही ट्विटवरुन लागवला आहे. महाराष्ट्राच्या मातीत महिलांच्या मातृत्वावरुन वादग्रस्त वक्तव्य करणारी भिडेंसारखी माणसे आहेत हे दूर्देवच असल्याचे बोखडे म्हणाल्या आहेत. तुम्ही मातृत्वाच्या सन्मानाला आज धक्का लावला आहे. तुमच्यासारखी माणसे महाराष्ट्राच्या मातीत आहेत, हे दुर्दैव आहे, असेही चाकणकर आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत. असेच ट्विट महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस शिल्पा बोखडे यांनीही केले आहे.


भिडे यांनी सांगलीमध्ये आजोजित एका कार्यक्रमामध्ये बोलताना मुले नसणाऱ्या स्त्रियाचा उल्लेख करताना, वांझोट्या बाईला स्त्रीत्व नसते, असा केला होता. राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर हिंदू शांत आहेत हे सांगताना त्यांनी स्त्रियांचा संदर्भ दिला. जसे नपुंसकत्व आल्यावर पुरुषत्व कमी होते तसेच वांझ स्त्रीमध्ये स्त्रीत्व कमी असते. अशा लोकांसाठी आपण नपुंसक आणि वांझ यासारखे शब्द वापरतो. तसेच हिंदूंच झाले आहे. हिंदूंमध्येही राष्ट्रीयत्व या विषयाबद्दल पुरुषत्व आणि स्त्रीत्व कमी आहे. राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर हिंदू समाज शंभर टक्के नपुंसक आणि वांझ असल्याचे वक्तव्य भिडे यांनी केले होते.

Leave a Comment