या युट्यूबरने ख्रिसमसच्या निमित्ताने वाटले हजारो गिफ्ट्स, व्हिडीओ व्हायरल

Image Credited – dexerto

अमेरिकेच्या नॉर्थ कॅरिलोना येथे राहणारा युट्यूबर मिस्टर बीस्ट उर्फ जिमी डोनाल्डसनचा ख्रिसमस स्पेशल व्हिडीओ  2 दिवसात सर्वाधिक पाहिला गेलेला व्हिडीओ ठरला आहे. त्याने ख्रिसमसच्या दिवशी जगभरातील हॉस्पिटल, अनाथश्रामांमध्ये 10 हजार विविध भेटवस्तू स्वतः वाटल्या. आतापर्यंत या व्हिडीओ 1 कोटी 40 लाखांपेक्षा अधिक वेळा पाहण्यात आले आहे. याचबरोबर 14 लाखांपेक्षा अधिक जणांनी लाईक व 1.5 लाख लोकांनी कमेंट्स केल्या आहेत.

23 डिसेंबरला त्याने न्युयॉर्क, वॉशिंग्टन डीसीसह संपुर्ण अमेरिकेत गिफ्ट्स वाटले. सर्वाधिक गिफ्ट्स हॉस्पिटल्समध्ये दिले. लहान मुलांना खास खेळणी दिली. एवढे गिफ्ट्स वाटण्यास खूप वेळ लागेल म्हणून त्याने एक जेट प्लेन भाड्याने घेतले व आपले दोन मित्र जॅक फ्रँकलिन आणि कॉनर सटनसोबत जगभरात गिफ्ट वाटले.

जेथे मिस्टर बीस्ट आणि त्यांचे मित्र पोहचू शकत नव्हते तेथे ट्रांसपोर्टेशनद्वारे खेळणी, कपडे, केक, मिठाई, बिस्किट्स, जेवण, कोट, मोजे, गरम कपडे, बूट सह अनेक वस्तू पाठवल्या. कोणत्या व्यक्तीला कोणत्या गोष्टीची गरज आहे हे पाहून ते त्या वस्तूचे पॅकेट गिफ्ट करत असे. बीस्टने सांगितले की, 2020 मध्ये तो काही आश्रयस्थळ देखील उघडणार आहे. यामध्ये लहान मुले आणि वृद्धांना ठेऊन त्यांची काळजी घेता येईल. याचवर्षी बीस्टने गरजूंना हजारो डॉलर्सची मदत केली होती.

Leave a Comment