चिमुरडा फोटो काढत असताना मागून आला वाघ, पुढे काय झाले बघाच

Image Credited – Indiatoday

शिकार करण्यासाठी वाघ एका लहान मुलावर झडप घेत असल्याचा थरारक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ही घटना आयर्लंडमधील डब्लिन प्राणीसंग्रहालयात घडली.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, लहान चिमुरडा वाघाकडे पाठ करून फोटो काढण्यासाठी तयार आहे. चिमुरडा फोटो काढत असताना अचानक वाघ अचानक त्याच्या दिशेने हळहळू चालत येतो. फोटो काढत असतानाच तो लहान मुलाच्या अंगावर झडप घेतो.

मात्र त्या मुलामध्ये आणि वाघामध्ये काच असल्याने मुलाचे प्राण वाचतात.

मुलाचे वडील रॉब यांनी या घटनेचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिले की, डब्लिन येथील प्राणी संग्रहालयात माझा मुलगा वाघासाठी मेन्यू झाला होता.

या घटनेनंतर रॉबने सांगितले की, वाघाने हल्ला केला तेव्हा माझ्या मुलाची प्रतिक्रिया अगदी शांत होती व तो खूप जोरात धावला.

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून, आतापर्यंत 2 लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत तर शेकडो युजर्सनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Leave a Comment