2020 मध्ये इस्त्रो लाँच करणार या महत्वकांक्षी योजना

Image Credited – ReviewStories

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेसाठी (इस्त्रो) 2020 हे वर्ष खूप महत्त्वाचे आहे. इस्त्रोने पुढील वर्षी अंतराळ क्षेत्रातील अनेक मोठे लक्ष्य निश्चित केले आहेत. 2020 मध्ये अनेक सेटेलाईट मिशन लाँचसोबत अंतरग्रहीय मिशन आदित्य आणि मिशन गगनयानसाठी इस्त्रो टेस्ट फ्लाइट लाँच करेल. मिशन गगनयानसाठी टेस्ट फ्लाइटचे नाव सध्या निश्चित झालेले नाही.

इस्त्रोचे चेअरमन के. सिवन म्हणाले की, पुढील वर्षी आमचे लक्ष्य 10 सेटेलाईट लाँच करण्याचे आहे. यामध्ये आधुनिक कम्युनिकेशन सेटेलाईट जीसॅट1, जीसॅट12आर आणि पृथ्वीचे निरिक्षण करणारे रीसॅट 2बीआर2, सर्विलांससाठी मायक्रोसॅटचा समावेश आहे. सोबतच आदित्य एल1 मिशनला 2020 च्या मध्यात लाँच करण्याची योजना आहे. मिशन गगनयानसाठी पहिल्या टेस्ट फ्लाइटला डिसेंबरमध्ये लाँच करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

इस्त्रोचे लक्ष आता सुर्यावर आहे. आदित्य एल1 हे मिशन देशाचे पहिले सोलर मिशन असेल. इस्त्रो प्रमुखांनी सांगितले की, एक पीएसएलव्हीचा प्रयोग स्पेसक्राफ्टचा भार वाहन करण्यासाठी असेल. यावर सध्या काम सुरू आहे. या मिशनबद्दल त्यांनी सांगितले की, 400 किग्रा च्या क्लास सेटेलाईट्समध्ये 6 वैज्ञानिक पेलोड्स असतील. 6 पेलोड्सचे काम ऑर्बिटच्या कक्षात येणाऱ्या प्रभावी क्षेत्राच्या सुरूवाती पॉईंटपर्यंत पोहचणे हे आहे. सध्या ऑर्बिट पृथ्वीपासून 1.5 मिलियन किमी अंतरावर आहे. याचा फायदा असा होईल की, कोणत्याही अडथळ्यांशिवाय सुर्याला सतत पाहता येईल.

इस्त्रोच्या दोन अन्य मिशनबद्दल माहिती देताना के. सिवन म्हणाले की, आरएलव्हीचे टेस्ट फ्लाइट लाँच आणि नवीन विकसित छोटे सेटेलाईटला (एसएसएलव्ही आणि मिनी पीएसएलव्ही) पुढील वर्षाच्या सुरूवातीला लाँच करण्याची योजना आहे.

Leave a Comment