सीएएमधील उपद्राव करणाऱ्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी वापरली ‘फिल्मी स्टाईल’

Image Credited – NDTV

उत्तर प्रदेशच्या आग्रामध्ये नागरिकत्व कायद्याचा विरोध करताना हिंसक प्रदर्शन करणाऱ्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी एक हटके कल्पना शोधून काढली आहे. तुम्ही चित्रपटात पाहिले असेल पोलीस गुन्हेगारांना पकडण्यासाठी वेश बदलून जातात. कधी पोलिसवाले फळविक्रेता होतात, तर कोणी भिकारी देखील बनते.

अशाच प्रकारे नागरिकत्व कायद्याचा विरोध करताना हिंसक प्रदर्शन करणाऱ्या लोकांना पकडण्यासाठी उत्तर प्रदेश पोलीस कर्मचारी फळविक्रेता झाले आहेत.

हिंसक आंदोलनकर्त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. पोलीस फळविक्रेता बनून रस्त्यावर उतरले आहेत. या गुन्हेगारांची रेकी करण्यासाठी पोलिसांनी हाथगाडी लावली आहे. पोलिसांना फिरोजाबाद येथून दंगेखोर येत असल्याची माहिती मिळाली होती.

अशाच पोलीस कर्मचाऱ्याचा एक फोटो व्हायरल होत आहे. सुभाष बाजार चौकीचे इंचार्ज सुनील तोमर केळीविक्रेता बनून फिरत आहेत. जे तोडफोड करण्याचा प्रयत्न करेल त्यांना त्वरित पकडले जाईल.

Leave a Comment