आरबीआयमध्ये या पदासाठी 926 जागांची भरती

Image Credited – Livemint

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) असिस्टेंटसाठी 926 पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. अर्ज प्रक्रिया 23 डिसेंबर 2019 ते 16 जानेवारी 2020 पर्यंत चालेल. या पदांसाठी आरबीआयच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येईल.

या पदांसाठी पुर्व परिक्षा 14 आणि 15 फेब्रुवारी 2020 ला होईल आणि मुख्य परिक्षाची संभावित तारीख मार्च 2020 असण्याची शक्यता आहे. या तारखेंमध्ये बदल देखील होऊ शकतात.

या पदासांठी उमेदवाराचे वय हे 20 ते 28 वर्षादरम्यान असणे गरजेचे आहे. एससी/एसटी साठी 5 वर्ष आणि ओबीसीसाठी 3 वर्ष वयाची सुट आहे. या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे व त्यात 50 टक्क्यांपेक्षा अधिक गुण असणे अनिवार्य आहे. आरक्षित वर्गाच्या उमेदवारांना केवळ पास असणे आवश्यक आहे.

Leave a Comment