देशातील पहिली लांब पल्ल्याची सीएनजी बस सेवा सुरू

Image Credited – Pragativadi

पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मंगळवारी देशातील पहिला सर्वात लांबचा प्रवास करणारी सीएनजी बस सेवेची सुरूवात केली. महिंद्रा कंपनीची ही सीएनजी बस दिल्ली ते देहरादून या मार्गावर धावेल. उत्तराखंडने या सेवेसाठी आयजीएलसोबत करार केला आहे. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात 5 सीएनजी बस चालवल्या जातील. त्यानंतर यांच्या संख्येत वाढ केली जाईल.

या बसचे वैशिष्ट्य याचे मायलेज आहे. दावा करण्यात आला आहे की, एकदा रिफिल केल्यानंतर ही बस 1000 किमीपेक्षा अधिक अंतर पार करू शकेल. बसमध्ये कंपोजिट इंजिनचा वापर करण्यात आलेला आहे. याचे वजन सध्याच्या सीएनजी सिलेंडरच्या तुलनेत जवळपास 70 टक्के कमी आहे. नवीन सिलेंडरमध्ये 225 ते 275 किलोग्राम सीएनजी भरता येतो. सध्या ज्या सीएनजी बस आहेत, त्यांच्या सिलेंडरमध्ये 80 ते 100 किलोग्राम सीएनजी भरता येतो.

बस सेवेसाठी महिंद्रा अँन्ड महिंद्रा आणि अमेरिकेच्या एगिलिटी सोल्युशनमध्ये करार झाला आहे. सीएनजी बसमुळे प्रदुषण देखील कमी होईल व इंधनावर होणारा खर्च देखील वाचेल.

Leave a Comment