येथे 1 किलो प्लास्टिक द्या आणि मोफत मिळवा जेवण, नाश्ता

Image Credited – Vice

प्लास्टिकच्या विरोधातील अभियानात त्याच्या बदल्यात छोटे-मोठे कूपन दिले जात असे. आता प्लास्टिक दिल्यावर हॉटेलमध्ये जेवण मिळण्यास देखील सुरूवात झाली आहे. दिल्लीतील द्वारका येथील दोन हॉटेलने प्लास्टिकच्या बदल्यात जेवण देण्यास सुरूवात केली आहे. हॉटेलने याला गारबेज कॅफे असे नाव दिले आहे. साउथ एमसीडीच्या आवाहनानंतर हॉटेलने याची सुरूवात केली.

द्वारकाच्या सेक्टर 12 मधील सिटी सेंटर मॉल आणि सेक्टर 23 येथील वर्धमान मॉलमध्ये हीरा कन्फेशनर्सने लोकांना प्लास्टिकच्या बदल्यात जेवण देण्यास सुरूवात केली आहे. दोन्ही जागेवर गारबेज कॅफेचे बॅनर लावण्यात आलेले आहे. यावर लिहिण्यात आले आहे की, 1 किलो प्लास्टिक घेऊन या आणि जेवण घ्या. 250 ग्रॅम प्लास्टिक आणा आणि नाश्ता करा.

सिटी सेंटर मॉलमध्ये 250 ग्रॅम प्लास्टिकसाठी समोसा-चहा, ब्रेड-वडे देण्यात येत आहेत. तर 1 किलो प्लास्टिकच्या बदल्यात पिझ्झा, डोसा आणि अन्य पदार्थ दिले जात आहेत.

साउथ एमसीडीच्या नजफगढ झोनचे डिप्टी कमिश्नर संजय सहाय म्हणाले की, आम्ही लोकांना स्वच्छ सर्वेक्षण 2020 साठी जागृक करत आहोत. त्यासाठीच प्लास्टिक फ्रीची योजना बनविण्यात आली आहे. इतर हॉटेल्सना देखील अशीच योजना सुरू करण्याचे आवाहन केले आहे. जमा होणाऱ्या प्लास्टिकला विल्हेवाटसाठी पाठवण्यात येईल.

Leave a Comment