विराट सेनेकडून काही तरी धडा घ्या, पाकिस्तानी खेळाडूंना शोएब अख्तरचा सल्ला


इस्लामाबाद : पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तरने पाकिस्तानी खेळाडूंना भारतीय टीमचे अनुकरण करा, आणि काहीतरी धडी भारताचा कर्णधार विराट कोहलीकडून घ्या, असा सल्ला दिला आहे. आपल्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून अख्तरने हा सल्ला दिला आहे. त्याच्या या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. त्यासोबतच व्हिडीओच्या कॉमेंटमध्येही विराटचे कौतुक युजर्सकडून केले जात आहे.

आपल्या आक्रमक क्रिकेट खेळीमुळे पाकिस्तान ओळखला जात होता. कधीही आम्ही घाबरत नव्हतो. आम्ही आक्रमकपणे खेळायचो आणि लढायचो, असे अख्तरने व्हिडीओमध्ये खेळाडूंना सल्ला देताना सांगितले. भारतीय कर्णधारासोबत आपल्या कर्णधाराची तुलना करा. अजहर अली (कर्णधार) आणि मिस्बाह उल हक (प्रशिक्षक) यांना असा मार्ग शोधावा लागेल, जो पाकिस्तानी संघात प्रगती घडवेल. अशी रणनीती असावी की कशाप्रकारे आपण विराट कोहलीच्या टीमपेक्षा उत्कृष्ट बनू, असे अख्तरने सांगितले.

त्याने यावेळी विराटच्या फिटनेसचे कौतुकही केले. तसेच टीम सुधारण्यासाठी पाकिस्तानचा माजी कर्णधार इमरान खान यांनी किती मेहनत घेतली होती याबद्दलही त्याने आपल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. अख्तर पुढे म्हणाला, कोहली फिटनेसप्रेमी आहे. असा कर्णधार जर असेल तर टीमही त्याला पूर्णपणे फॉलो करते. मला अशी एक गोष्ट आपल्या सांगावीशी वाटते की टीममध्येही जेव्हा इमरान खान कर्णधार होते तेव्हा फिटनेस पाकिस्तानी संघात होती. ते मैदानावर यायचे आणि कुणाचेही न ऐकता मैदानात 10 फेऱ्या मारायचे. त्यानंतर तीन तास नेटमध्ये गोलंदाजी करत होते. ते रणनीतीमध्ये मजबूत कर्णधार नसले तरी सामना कसा जिंकता येईल याची माहिती त्यांना होती. भारतही आता तेच करत आहे. कोहलीची नजर पाहा तो आक्रमकपणे खेळत असतो. खेळाडू कर्णधाराला फॉलो करतात, असेही अख्तरने सांगितले.

Leave a Comment