ट्रोलिंगला वैतागून जावेद जाफरीने सोडला ट्विटरचा ‘नाद’


देशभरातील विविध राज्यात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आणि समर्थनात आंदोलने सुरू आहेत. तर केंद्र सरकार अफवांवर विश्वास ठेवू नका, असे सांगत आपल्या भूमिकेवर ठाम आहे. दुसरीकडे सीएए आणि एनसीआरवरुन सोशल मीडियावरही विरोधक समर्थक आपली बाजू मांडत आहेत. यात अनेकांना ट्रोल केले जात आहे. अभिनेता जावेद जाफरीने या वादामुळे खिन्न होऊन सोशल मीडियाचा नाद सोडला आहे.

जावेद जाफरीचाही CAA आणि NRCला विरोध करणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये समावेश आहे. जावेद जाफरीलाही विरोध करणाऱ्या इतर सेलिब्रिटींप्रमाणे मोठ्या प्रमाणात ट्रोल केल्यामुळे त्याने वैतागून ट्विट केले. काही कालावधीसाठी आपण सोशल मीडियाचा नाद सोडत असल्याचे त्याने जाहीर केले आहे.

आता आपण या ट्रोलिंगला आणि द्वेषाला आणखी सहन करू शकत नाही. परिस्थिती चांगली होती नाही तोपर्यंत सोशल मीडियापासून दूर राहणार असल्याचे जावेद जाफरीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्याने सोशल मीडियावर CAA आणि NRCला विरोध करणारे व्हिडिओ शेअर केले होते. याशिवाय जावेद जाफरीचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला. यात सरकारविरोधात भाषण करताना तो दिसत आहे.

Leave a Comment