मि. युनिव्हर्स संग्राम चौगुलचे फिल्मी एंट्री


लवकरच ‘दंडम’ या चित्रपटाच्या माध्यमातून शरीर सौष्ठव स्पर्धेत मिस्टर युनिव्हर्स हा किताब पटकावलेला संग्राम चौगुले प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर देखील काही दिवसांपूर्वी लॉन्च करण्यात आला होता. प्रेक्षकांचा ट्रेलरला देखील चांगला प्रतिसाद मिळाला होता.

दंडम हा पहिला मराठी चित्रपट आहे, जो चित्रपट तेलगू आणि तामिळ या दोन भाषेत डब केला जाणार आहे. प्रेक्षकांना जबरदस्त अॅक्शन आणि मसाला असलेल्या या चित्रपटातील गाणीदेखील आवडली असून हा चित्रपट येत्या २७ डिसेंबरला रिलीज होणार आहे.

‘दंडम’ची कथा बीड सारख्या ग्रामीण भागाचा विकास करणाऱ्या कलेक्टरवर आधारित आहे. जर एक सरकारी अधिकारी आपले अधिकार वापरू लागला तर केवढा बदल तो घडवू शकतो हे या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे. चित्रपट निर्मात्यांनी खिळवून ठेवणारे कथानक तरुण पिढीला मार्गदर्शक ठरेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

प्रसेनजीत कोसंबी, जसराज जोशी, आदर्श शिंदे, जुईली जोगळेकर, आनंदी जोशी यांनी दंडम चित्रपटातील ‘बिगी बिगी’, ‘साजनी’, ‘झंझावत’, ‘मन मोहिनी’, ‘द बंगळंग सॉंग’ ही गाणी गायली आहेत. तर व्ही सत्तू यांचे दिग्दर्शन असलेला हा अॅक्शन असलेला चित्रपट वादात अडकल्यामुळे १८ ऑक्टोबरला रिलीज होणारा चित्रपट लांबणीवर पडला होता.

Leave a Comment