तान्हाजीमधील नवे गाणे तुमच्या भेटीला


बॉलीवूडचा सिंघम अर्थात अभिनेता अजय देवगणच्या बहुचर्चित ‘तानाजी: द अनसंग वॉरिअर’ची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा होत आहे. त्यातच या चित्रपटातील एकाहून एक सरस गाणी रिलीज करण्यात येत आहेत. या चित्रपटातील नवीन गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे.

प्रेक्षकांच्या भेटीला अंगावर काटा आणणारे आणि मराठ्यांच्या धमन्यांत सळसळत रक्त निर्माण करणारे ‘घमंड कर’ हे गाणे आले आहे. या गाण्याचे संगीत आणि आणि अजय देवगणचा दमदार अंदाज हे वैशिष्ट्य आहे. अजयसह या चित्रपटात काजोल, सैफ अली खान, शरद केळकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हे गाणे सचेत टंडन आणि परंपरा ठाकूर यांच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आले आहे.

अनिल वर्मा यांनी हे गाणे लिहिले असून सचेत आणि परंपरा यांनी या गाण्याला संगीत दिले आहेत. ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण आणि सैफ अली खान ही जोडी तब्बल 13 वर्षांनंतर एकत्र येणार असल्यामुळे या चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. 13 वर्षांपूर्वी हे दोघे ‘ओमकारा’ चित्रपटात एकत्र दिसले होते. येत्या 10 जानेवारी 2020ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment