तुम्ही देखील कराल पोलार्डच्या खिलाडू वृत्तीला सलाम


कटक – भारतीय संघाने वेस्ट इंडीज विरुद्धच्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात ४ गडी राखून विजय मिळवला आणि २-१ ने मालिका खिशात घातली. नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार विराट कोहलीने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पूरन आणि पोलार्डच्या अर्धशतकाच्या जोरावर विंडीजने भारताला ३१६ धावाचे लक्ष्य दिले. भारतीय संघाने तेव्हा विराट कोहली, लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांच्या अर्धशतकांच्या जोरावर हा सामना जिंकला. पण शार्दुल ठाकूर या सामन्यात भारतीय संघासाठी तारणहार ठरला. मोक्याच्या क्षणी दणकेबाज खेळी करत त्याने संघाला विजय मिळवून दिला.


दरम्यान या वर्षातील भारतीय संघाचा हा शेवटचा सामना होता. भारतीय संघाने तो सामना जिंकत वर्षाचा गोड शेवट केला. दरम्यान, विराट कोहली या सामन्यात बाद झाल्यानंतर भारतीय संघ पराभूत होणार असे वाटत होते. तेव्हा शार्दुल ठाकूर आणि रवींद्र जडेजा या जोडीने भारताला विजय मिळवून दिला. या सामन्यात शार्दुलने ६ चेंडूत ४ चौकार आणि एक षटकारांच्या मदतीने नाबाद १७ धावा केल्या. भारताने याच खेळीच्या जोरावर विजय मिळवला.

या सामन्यातील महत्वाच्या क्षणाचा एक व्हिडिओ बीसीसीआयने शेअर केला आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यात आपल्या संघातील सहकाऱ्यांसोबत शार्दुल ठाकूर आणि रवींद्र जडेजाच्या खेळीवर आनंद व्यक्त करताना दिसत आहे. तर, सामना जिंकल्यानंतर जडेजा जल्लोष साजरा करताना पाहायला मिळत आहे. विशेष वेस्ट इंडिजचा कर्णधार केरॉन पोलार्ड सामना संपल्यानंतर जडेजाची गळाभेट घेताना दिसत आहे.

Leave a Comment