… आणि लाईव्ह रिपोर्टिंग दरम्यानच महिला पत्रकाराला लागली लाखोंची लॉटरी

(Source)

लॉटरी लागणे हा नशीबाचा खेळ आहे. अनेकजण लॉटरी काढतात मात्र सर्वांनाच ती लागते असे नाही. मात्र एका महिला पत्रकारासोबत लॉटरी दरम्यान एक खास घटना घडली. एका महिला पत्रकाराला तब्बल 4 लाख रुपयांची लॉटरी लागली. विशेष म्हणजे ही लॉटरी ती रिपोर्टर त्याच लॉटरी ड्रॉची लाईव्ह रिपोर्टिंग करत होती.

या महिला पत्रकाराच्या चेहऱ्यावरचा आनंद लाईव्ह टिव्हीवर संपुर्ण जग पाहत होते. महिला पत्रकाराने आनंदाने म्हटले देखील की, ती उद्यापासून कामालाच जाणार नाही.

नतालिया एस्कोदेरो आरटीवीई च्या पत्रकार आहेत. त्या स्पेनमध्ये ख्रिसमस लॉटरी ड्रॉचे लाईव्ह रिपोर्टिंग करत होत्या. इतरांबद्दल सांगत असताना अचानक त्यांना समजले की, त्या स्वतः ड्रॉमध्ये 10वे बक्षीस जिंकल्या आहेत. त्यांनी 5000 युरोची (जवळपास 4 लाख रुपये) लॉटरी लागली.

हा लॉटरी ड्रॉ 22 डिसेंबरला स्पेनच्या मॅद्रिद शहरात झाला. नतालिया यांना लॉटरी लागल्याची माहिती मिळताच त्या कॅमेऱ्यावर म्हणाल्या की, मला 10वे बक्षीस मिळाले आहे. ही मस्करी नाही. जेव्हा मी या कार्यक्रमाला आले होते, त्यावेळी तिकीट खरेदी केले होते. आता मी उद्या ऑफिसला नाही येणार.

आपला आनंद नतालिया दुसऱ्या लोकांसोबत साजरा करताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

Leave a Comment