‘ग्रीन टी’च्या अतिसेवनामुळे होऊ शकतात या समस्या

(Source)

मागील काही वर्षात भारतात ग्रीन टीचे सेवन अधिक वाढले आहे. ग्रीन टी आरोग्यासाठी चांगले आहे, यात शंकाच नाही. ग्रीन टी अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडेंट्स असतात. जे शरीरातील मेटाबॉलिज्म सुधारते, कॉलेस्ट्रॉल कमी करते. ग्रीन टी जिंक, मॅग्नीज आणि व्हिटामीन ए, बी, सी ची मात्रा देखील असते. मात्र हे सर्व फायदे असले तरी ग्रीन टीच्या अतिसेवनामुळे आरोग्याला देखील नुकसान पोहचते.

(Source)

तोंडात फोडी येणे –

ग्रीन टीमध्ये टॅनिंस तत्व असते. जास्त ग्रीन टी पिल्याले टॅनिंस त्वचा कोरडी पडणे, तोंड कोरडे पडणे, पोट दुखणे आणि तोंडात फोडी येणे सारख्या समस्या होतात.

(Source)

ब्ल्ड प्रेशर वाढते –

अधिक प्रमाणात ग्रीन टीचे सेवन केल्याने ब्लड प्रेशरचा देखील धोका निर्माण होतात. ग्रीन टीमध्ये कॅफिन अधिक मात्रेत असतात. याच्या अधिक सेवनाने ह्रदयावर दबाव पडतो व तुमचे ब्लड प्रेशर वाढते.

(Source)

मानसिक तणाव आणि चिंता वाढणे –

ग्रीन टी तणाव कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. मात्र अती सेवनामुळे याचा उलट परिणाम होऊन मानसिक तणाव आणि चिंता देखील वाढते.

(Source)

अशक्तपणा होऊ शकतो –

ग्रीन टीमध्ये काही असे तत्व असतात, जे शरीरातील आयरनला (लोह) शोषून घेण्यापासून रोखते. त्यामुळे तुम्ही ग्रीन टीचे अधिक सेवन करत असाल तर तुम्ही ज्या पदार्थांचे सेवन करतात त्यातील आयरन शरीराला मिळणार नाहीत. अशा परिस्थितीत रेड ब्लड सेल्स कमी होतात आणि अशक्तपणा येऊ शकतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment