हे आहे केसापेक्षाही पातळ जगातील सर्वात छोटे घर

(Source)

कॅनडाचे मायक्रोस्कोप तज्ञ ट्रेविस केसग्रेड यांनी मनुष्याच्या केसापेक्षा अधिक पातळ घर तयार केले आहे. हे जगातील सर्वात छोटे घर असून, ज्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या मदतीने तयार करण्यात आले आहे. या घराला धूर जाण्यासाठी चिमणी, खिडकी, दरवाजे देखील असून, याला ‘जिंजरब्रेड हाउस’ असे नाव देण्यात आलेले आहे.

(Source)

2018 मध्ये जगातील सर्वात छोट्या घराचा विक्रम फ्रान्समध्ये बनवण्यात आला होता. मात्र जिंजरब्रेड हाउस आकाराने मागील घराच्या तुलनेत 50 टक्के अधिक छोटे आहे. मायक्रोस्कोप तज्ञ ट्रेविस केसग्रेंड यांनी गॅलियम आयनच्या मदतीने हे घर तयार केले आहे.

घर खूपच छोटे असल्याने इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपनेच संभव झाले आहे. इलेक्ट्रॉनची वेव लेंथ प्रकाशपासून 1 लाख पट कमी आहे. त्यामुळे त्याला सहज मोठ्या आकारात पाहता येते. गॅलियम आयनच्या किरणांनी घराच्या छोट्य-छोट्या भागाला आकार देण्यात आला आहे.

मायक्रोस्कोप तज्ञ ट्रेविस केसग्रेंडने जिंजरब्रेड हाउस मॅकमास्टर युनिवर्सिटीच्या टीमबरोबर मिळून तयार केले आहे. 2017 मध्ये ट्रेविसने एका नाण्यावर कॅनडाचा ध्वज बनवला होता. हा ध्वज डोळ्यांनी बघणे शक्यच नाही.

 

Leave a Comment