सुंदर पिचाईंना मिळणार एवढ्या कोटींचा बोनस

(Source)

आधी गुगल आणि त्यानंतर त्याची मूळ कंपनी अल्फाबेटचे सीईओ झालेले सुंदर पिचाई हे कमाईच्या बाबतीत देखील जगातील सर्वात टॉप सीईओ पैकी एक आहेत. जर सुंदर पिचाई यांनी टार्गेट पुर्ण केले तर पुढील 3 वर्षात त्यांना अवॉर्ड म्हणून 240 मिलियन डॉलर म्हणजेच तब्बल 1721 कोटी रुपये मिळतील. या व्यतरिक्त 2 मिलियन डॉलरचा पगार देखील वेगळा दिला जाणार आहे.

कंपनीकडून सुंदर पिचाई यांना अनेक टार्गेट्स देण्यात आलेले आहेत. ते पुर्ण केल्यावर त्यांना अवॉर्ड मिळेल. एकूण रक्कमे पैकी 640 कोटी रुपये परफॉर्मेंस बेस्ड स्टॉक असतील.

47 वर्षीय पिचाई यांनी याच वर्षी गुगलचे मूळ कंपनी अल्फाबेटचे सीईओ पद स्विकारले आहे. या आधी लेरी पेज हे अल्फाबेटचे सीईओ होते.

पिचाई हे 2004 पासून गुगलशी जोडलेले असून, 2015 ला ते गुगलचे सीईओ झाले होते. 2018 मध्ये पिचाई यांनी कंपनीने एकूण 1.9 मिलियन डॉलर रुपये स्टॉक, पगार स्वरूपात मिळाले होते.

Leave a Comment