WWE ने सलमानसाठी पाठवले हे खास गिफ्ट

(Source)

अभिनेता सलमान खानचा चित्रपट ‘दबंग-3’ प्रदर्शित झाला असून, बॉक्स ऑफिसवर चित्रपट जोरदार कमाई करत आहे. दबंगच्या निमित्ताने रेसलिंग कंपनी डब्ल्यूडब्ल्यूईने सलमानसाठी एक खास गिफ्ट पाठवण्यात आले आहे.

सलमान खानसाठी एक खास बेल्ट डब्ल्यूडब्ल्यूई पाठवण्यात आला आहे. डब्ल्यूडब्ल्यूईने चित्रपट रिलीज सेलिब्रेट करण्यासाठी सलमानला खास बेल्ट पाठवला आहे.

हा बेल्ट सलमानसाठी खास डिझाईन करण्यात आलेला आहे. यावर सलमानचे नाव देखील लिहिलेले आहे. बेल्टमधील साइट प्लेट्स आणि सलमानचे नाव हे सोन्याने लिहिण्यात आलेले आहे.

दरम्यान, सलमानच्या दबंग-3 बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत असून, चित्रपटाने पहिल्याच दिवशी 24.5 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे.

Leave a Comment