CAA: रितेश देशमुख हिंसाचार करणाऱ्यांवर संतापला


बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आवाज उठवत असून त्यावर आपले मत व्यक्त करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून नागरिकत्व कायद्याविरोधात सुरू असलेले आंदोलन आता चांगलेच चिघळले आहे. विद्यापीठांसह शिक्षण संस्थांच्या आवारातील आंदोलनाची धग गुरुवारी देशभर पसरली आणि दिल्लीसह मुंबई, बंगळूरु, लखनऊ आदी शहरांबरोबरच विविध राज्यांत लोक रस्त्यावर उतरले. लखनऊमध्ये पोलिसांच्या गोळीबारात एक तर मंगळूरमध्ये दोघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी देशभरात हजारो आंदोलकांची धरपकड केली. यावेळी काही ठिकाणी आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला केल्याचेही पहायला मिळाले.

ट्विटरच्या माध्यमातून अभिनेता रितेश देशमुखनेही आपले मत व्यक्त करत एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये आंदोलक पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करताना दिसत आहेत. यावर रितेशने संताप व्यक्त हे कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाऊ शकत नसल्याचे म्हटले आहे. आपल्या ट्विटमध्ये रितेशने लिहिले आहे की, हे कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाऊ शकत नाही. हे आंदोलक शांततेत चालणाऱ्या आंदोलनामुळे मिळणाऱ्या यशात हिंसाचार भडकवून आणि दगडफेक करत अडथळा आणत असून त्यांना तात्काळ अटक केली पाहिजे. हिंसाचार न करण्याचे रितेशने आपल्या ट्विटमधून आवाहन केले आहे.

Leave a Comment