प्रवीण तांबे ठरला आयपीएलमधील ज्येष्ठ खेळाडू


कोलकाता – आयपीएलच्या तेराव्या हंगामातील मुंबईचा ज्येष्ठ फिरकीपटू प्रवीण तांबे हा सर्वात ज्येष्ठ खेळाडू ठरला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने ४८ वर्षीय प्रवीण तांबेवर २० लाखांची बोली लावली आहे. २०१३ साली आयपीएलमध्ये पहिल्यांदा प्रवीणने पाऊल टाकले. प्रवीणने राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना गोलंदाजीत आपले कौशल्य दाखवून दिले होते.


२०१४ च्या हंगामात आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून प्रवीण तांबेच्या नावावर हॅटट्रीकची नोंद आहे. याव्यतिरिक्त प्रवीणने हॅटट्रीक टी-१० लिग स्पर्धेतही नोंदवली होती. प्रवीण अशी कामगिरी करणारा पहिला गोलंदाज ठरला होता. आयपीएलमधील आतापर्यंतच्या कारकिर्दीत प्रवीणच्या नावावर २८ बळी जमा असल्यामुळे आयपीएलच्या आगामी हंगामात प्रवीण तांबेला कोलकात्याच्या अंतिम ११ जणांच्या संघात जागा मिळेल की नाही ते आगामी काळच सांगेल.

Leave a Comment