एलॉन मस्क अंतराळात पाठवणार गांजा

(Source)

टेक्नोलॉजीच्या जगात एलॉन मस्क हे मोठे नाव आहे. त्यांची कंपनी स्पेसएक्सला नासाकडून अनेक कॉन्ट्रॅक्ट मिळत असतात. आता त्यांची कंपनी अंतराळात गांजा पाठवणार आहे.

मार्च 2020 मध्ये त्यांची कंपनी हा कारनामा करेल. एक स्पेस कॅप्सूल पाठवण्यात येईल. याचे नाव ड्रॅगन आहे. हेच अंतराळात गांजा घेऊन जाणार आहे.

या कॅप्सूलमध्ये केवळ गांजाच नाही तर अनेक गोष्टी पाठवण्यात येणार आहेत. जवळपास 480 प्रकारच्या झाडांची बियाणे पाठवली जाणार आहेत. कोलोराडो युनिवर्सिटीसोबत मिळून सध्या संशोधन सुरू आहे. यामध्ये पाहण्यात येईल झाडांच्या या बियांवर शून्य ग्रॅव्हिटीमध्ये काय परिणाम होईल. याशिवाय कॉस्मिक रेंजमध्ये गेल्यावर काय होते, हे पाहिले जाईल.

आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये या झाडांच्या पेशींना ठेवण्यात येईल. 30 दिवस यावर संशोधन केले जाईल. सेल्सला एक ठराविक उर्जा प्रदान केली जाईल. येथे युनिवर्सिटीचे विद्यार्थी या पेशींवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणार आहेत. त्यानंतर या पेशींना पुन्हा पृथ्वीवर आणण्यात येईल व त्यांची तपासणी केली जाईल. या प्रक्रियेमध्ये झाडांच्या डीएनएमध्ये काही बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Leave a Comment