हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलीस उपायुक्ताने गायले राष्ट्रगीत!


बंगळुरू – सध्या देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलने सुरू असून पोलीस आक्रमक आंदोलकांना रोखण्यासाठी कधी लाठीचार्ज, कधी अश्रूधुराचा मारा तर कधी गोळीबारही करत आहेत. पण याला बंगळुरुचे पोलीस उपायुक्त चेतन सिंह राठोड अपवाद ठरले आहेत.


(व्हिडीओ सौजन्य ANI)
आंदोलकांना पांगवण्यासाठी बंगळुरूचे पोलीस उपायुक्त चेतन सिंह राठोड यांनी वेगळीच शक्कल लढवली. माईकच्या सहाय्याने त्यांनी मोठ्या आवाजात राष्ट्रगीत गाण्यास सुरुवात केली. त्यांनी राष्ट्रगीताला सुरुवात करताच, जागीच स्तब्ध उभे राहून आंदोलकांनीही त्यांना साथ दिली. दरम्यान, पोलिसांनी मंगळुरूमधील आंदोलनादरम्यान केलेल्या गोळीबारामध्ये काल दोन आंदोलकांना आपला जीव गमवावा लागल्यानंतर, मंगळुरू आणि दक्षिण कन्नड जिल्ह्यांमध्ये दोन दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली.

Leave a Comment