‘दबंग ३’ चित्रपटातील ‘आवारा’ गाणे रिलीज


अभिनेता सलमान खानच्या आगामी ‘दबंग ३’ चित्रपटाची उत्सुकता दिवसागणिक वाढताना दिसत आहे. नुकतेच या चित्रपटातील प्रेमावर आधारित ‘आवारा’ गाणे रिलीज करण्यात आले आहे. ‘आवारा’ गाण्याच्या माध्यमातून प्रेमाला कोणत्याही प्रकारचे बंधन नसते. याचा प्रत्येय होत आहे. हे गाणे सलमानने रिलीज केले आहे.

सलमानने काही दिवसांपूर्वी या गाण्याचा ऑडिओ रिलीज केला होता. त्यामुळे सलमान या गाण्यात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि सई मांजरेकर पैकी कोणासोबत रोमांन्स करताना दिसेल? असा प्रश्न उपस्थित राहिला होता. पण तो आणि सई या गाण्यामध्ये रोमांन्स करताना दिसत आहे.

‘दबंग ३’ चित्रपटाच्या माध्यमातून मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकरांची कन्या बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. सई सलमानच्या प्रेयसीच्या भूमिकेत झळकणार आहे. ‘दबंग-३’ चित्रपट २० डिसेंबर २०२० ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी प्रभूदेवा यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.

Leave a Comment