Video : कुत्र्याने कार चालवत थेट तलावात घातली गाडी

(Source)

काही दिवसांपुर्वीच दुचाकीवर कुत्रे निवांत बसून प्रवास करतानाचा फोटो व्हायरल झाला होता. मात्र चीनमधील झेंजिंग येथे एका कुत्र्याने थेट कार चालवण्याचा पराक्रम केला आहे. मात्र या कुत्र्याला कार चालवणे चांगलेच महागात पडले व त्याने कार थेट तलावातच घातली.

सोशल मीडियावर सध्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. कारचा मालक जिआ कुत्र्याला गाडीत तसेच सोडून वॉलेट आणि काही बॉक्स आणायला घरी परत जातो. मात्र जाताना तो गाडी तशीच सुरू ठेवतो व कारचा दरवाजा देखील उघडा असतो. कार चालू असताना कुत्र्याकडून चुकीने गिअर बदलले जातात व त्यामुळे कार तलावात पडते.

कारचा मालक परत आल्यावर त्याची कार थेट तलावात असल्याचे पाहून धक्का बसल्याशिवाय राहत नाही. कुत्रे देखील कारमधून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करत असते. अखेर कारचा मालक त्वरित आजुबाजूच्या लोकांकडे मदत मागून कुत्र्याला बाहेर काढतो.

Leave a Comment