बॉयफ्रेंडला घातली लग्नाची मागणी, बीएमडब्ल्यू कार आणि घर दिले भेट

(Source)

मुलीला खुष करण्यासाठी मुलं काय काय करत नाहीत. गर्लफ्रेंडला फिल्मी अंदाजात गुडघ्यावर बसून प्रपोज करण्यापासून ते तिच्यासाठी महागडे गिफ्ट आणणे अशा अनेक गोष्य मुलं करत असतात. मात्र चीनमध्ये एका मुलीने या सर्वांच्या उलट गोष्ट करत सर्वांना आश्चर्याचाच धक्का दिला आहे.

एकमेंकांना भेटून एक वर्ष झाल्याच्या निमित्ताने 24 वर्षीय शिओजिंगने बॉयफ्रेंड शिओकेला ज्या ठिकाणी ते सर्वात प्रथम भेटले होते त्या ठिकाणी भेटण्यास बोलवले. मात्र या निमित्ताने मुलीच्या मनात दुसराच विचार सुरू होता. आपल्या मित्रांबरोबर आणि कुटुंबाबरोबर मिळून मुलीने बॉयफ्रेंडसाठी खास सरप्राईज प्लॅन केला होता.

ठरलेल्या ठिकाणी भेटल्यानंतर मुलीने पुष्पगुच्छ आणि बीएमडब्ल्यू कारची चावी देत मुलाला सरप्राईज दिले व लग्नासाठी मागणी घातली. याशिवाय तिने घराचे कागद देखील त्याला दिले.

या क्यूट जोडप्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुलीने आपल्या कुटूंबासोबत मिळून बॉयफ्रेंडसाठी खास कार आणि घर खरेदी केले.

शिओजिंग म्हणाली की, त्याने माझ्यासाठी केलेल्या कृत्यासाठी मला त्याला काहीतरी खास गोष्ट द्यायची होती. ती म्हणाली की, मला त्याच्याबरोबर संपुर्ण आयुष्य घालवायचे आहे. तिच्या बॉयफ्रेंडने देखील प्रपोजला ‘होकार’ दिला.

Leave a Comment